भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडुनी तया न वचे दुरी । त्यांचा करी प्रतिपक्ष

soduni taya na vache duri | tyancha kari pratipaksha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सोडुनी तया न वचे दुरी । त्यांचा करी प्रतिपक्ष ॥१॥ म्हणे मी त्यांचा तेही माझे । नव्हती दुजे कल्पांतीं ॥२॥ मी तूं म्हणतां वेगळे न हों । मुळींचे आहों एकाएकीं ॥३। निळा म्हणे देवभक्तां । एकात्मता ठायींची ॥४॥