भजनी मालिका
← भजनांकडे परत

सैंध दाटली अक्षरें । माप नव्हें पुरें । केली माझीया दातारें । अतिवृष्टी कृपेची

saindh datali aksharen | map navhen puren | keli majhiya dataren | ativrushti krupechi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सैंध दाटली अक्षरें । माप नव्हें पुरें । केली माझीया दातारें । अतिवृष्टी कृपेची ॥१॥ लिहितां न पुरे दिवसराती । वाढविला विस्तार तो मती । जैसे क्षीराब्धीवरीं येती । तरंग मिरविती असंख्य ॥२॥ नाना प्रमेय नाना कथा । नाना पदांचिया चळथा । निघती त्या पंढरीनाथा । आवडती प्रियवादें ॥३॥ संतचरित्रें हरिचें गुण । केलें पवाडें ते विंदान । नाना पतितांचे उध्दरण । केलें संरक्षण दासांचें ॥४॥ ऐशिया स्तवनीं लाविली वाचा । बडीवार हरीचिया नामाचा । केला प्रतिपाळ तो दासाचा । वारंवार आठवितों ॥५॥ नाना नामें नाना चरित्रें । कल्याणरुपें अती पवित्रें । श्रवणें पठणें गातां वक्त्रें । हरिच्या पदातें पावविती ॥६॥ आइती जोडूनियां ठेविलीं । होतीं ठायींचि गुंफिलीं । निळा म्हणे तेचि वोपिलीं । माझिये वदनीं वरदानें ॥७॥