भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रुप केलें

svami ek mhanavi das | avadis rup kelen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रुप केलें ॥१॥ मुळींचे दोघां एकपण । परीं हें भिन्न्‍ दाखविलें ॥२॥ एक म्हणे धांवा धांवा । एक कुडावा करी त्याचा ॥३॥ निळा म्हणे नवल वाटे । साने मोठे नव्हती हे ॥४॥