भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नीं देखिलें तें जागृतीये नाहीं । हारपोनियां ठायी ठावोचि नुरे

svapnin dekhilen ten jagrutiye nahin | haraponiyan thayi thavochi nure

रचनाकार: संत निळोबा · अभंग
स्वप्नीं देखिलें तें जागृतीये नाहीं । हारपोनियां ठायी ठावोचि नुरे ॥१॥ तेचि परी झाली माझिया मानसा । संसारात माशा क्षंणेचि विरे ॥२॥ कैंची हे संपत्ति धन वित्त पशु । लटिकाचि आभासु मायीक तो ॥३॥ निळा म्हणे एक सत्य हरीचें नाम । येर अवघाचि श्रम मिथ्याभूत ॥४॥