भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिरुप ध्यानीं हरिनाम वदनीं । हरीच्या चिंतनीं तद्रूपता

harirup dhyanin harinam vadanin | harichya chintanin tadrupata

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरिरुप ध्यानीं हरिनाम वदनीं । हरीच्या चिंतनीं तद्रूपता ॥१॥ हरि तयां अंतरी हरि तयां बाहेरी । रक्षी निरंतर श्रीहरी त्यां ॥२॥ हरि तयां आसनीं । हरि तयां भोजनीं । हरि तयां शयनी निद्रा करी ॥३॥ निळा म्हणे हरि देह गेह दारा । हरी दुजा वारा लागों नेदी ॥४॥