भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडविलीं ऐसी बहुतें आयकें । भूतळीं पातकें तरलीं नामें

sodavilin aisi bahuten ayaken | bhutalin pataken taralin namen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सोडविलीं ऐसी बहुतें आयकें । भूतळीं पातकें तरलीं नामें ॥१॥ बोलियेले संत पुराणीं व्याख्यानें । तारिले चिंतनें महापापी ॥२॥ अजामेळ गणिका पौंडिक जरव्याध । नाहीं अपराध विचारिले ॥३॥ निळा म्हणे तोचि धरिला विश्वास । घालुनियां कास नाम गातों ॥४॥