भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली ॥१॥ हातीं धरुनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥ वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥ पायांवरी माथा आळीगीन बाहीं । घेइऩन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकी नुरेचि कांहीं । मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

मी अल्प मतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काई । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥१॥ पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥ नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी तव बैसलों धरुनियां आस । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळींकारी ॥१॥ कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥ आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥ राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम