भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काई । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले

mi avaguni anyayi kiti mhanon sangon kai | atan maj payin thav dei viththale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काई । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥१॥ पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥ अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥२॥ तुका म्हणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥३॥