भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी अल्प मतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें

mi alpa matihin | kay varnu tujhe gun | udakin tarile pashan | hen mahiman namachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी अल्प मतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥२॥ शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ती वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥३॥ राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥