भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळींकारी

mi ton bahu sukhi anandabharita | ahen sadhusantan melinkari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळींकारी ॥१॥ कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥ न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥२॥ मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥३॥ तुका म्हणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकळिकां कळों यावें ॥४॥