भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तीरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥ हरीदासां मुखें हरीकथाकीर्तन । तेथें पुण्या पुण्य विशेषता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥ उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मौन कां धरिले विश्वाच्या । जीवना उत्तर वचना देई माझ्या ॥१॥ तूं माझे संचित तूंचि पूर्वपुण्य । तूं माझे प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणऊनि काकुळती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥ फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगेची उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम