भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें

mhanauni das navhe aisa jalon | anubhaven bolon svamipudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥ कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥ तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥