भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरी हिता

moharoni chitta | anun halun chi vari hita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरी हिता ॥१॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥ संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥ एखादिया भावें । तुका म्हणे जवळी यावें ॥३॥