यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा
yatihin maj kay to abhiman | mani tuj jan narayana
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
yatihin maj kay to abhiman | mani tuj jan narayana
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
yati matihin rupen lin din | anik avagun janoniyan
याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥
yal tari ya re lagen | avaghe majhya magen magen
याल तरी या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥ आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥
yalagin avadi mhana ram krushna | joda narayan sarvakal
यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥ सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरी ॥ध्रु.॥
yavari na kale sanchit apulen | kaisen vodavalen hoil pudhen
यावरी न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होईल पुढें ॥१॥ करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥
yaven maheras | he cha sarvakal as
यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥१॥ घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥
yansi samachar sangaton sakala | chalaven gokula mhane dev
यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥ देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥
yasi koni mhane nindechin uttaren | nagavala kharen tochi ek
यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तोचि एक ॥१॥ आड वाटे जातां लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥
yuktahar na lage anik sadhanen | alpa narayanen dakhavilen
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटी ॥ध्रु.॥
yukti tanv jhalya kunthit sakala | urali he kala jivanachi
युक्ती तंव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥
ye dashe charitra kelen narayanen | rangatan godhanen rakhitahe
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥ हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥
ye re krushna khunaviti khelon bhatuken | milaliya bala eke thayin kavatuken
ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें । कळों नेदी माया त्यासचि ते ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥१॥
ye hari maj krupa dei dan | nasi timir dakhavi charan | arta puravave bheti deun | nako upekshun aliya sharan
ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण । आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण ॥१॥ काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणिक दुजे मागणे तुज नाही ॥ध्रु.॥
yei gan tun mayabapa pandharichya raya | tujavin sin vate kshin jali kay
येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काय ॥१॥ याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥ध्रु.॥
yei ga viththala yei ga viththala | pran ha phutala alavitan
येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥ पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उशीर कां अझूनि लावियेला ॥ध्रु.॥
yeil tujhya nama | laj mhanu purushottama
येईल तुझ्या नामा । लाज म्हणू पुरुषोत्तमा ॥१॥ धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥
yeil ten ghein bhaga | navhe joga dusariya
येईल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥ आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥
yeuni sansarin | mi ton ek janen hari
येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥ नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥
yeuni jauni pahen tujakade | padilya sankaden narayana
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरी भार जीवें भावें ॥ध्रु.॥
yeun dya ji kanhin vesakaras | antun baher vojecha ghas
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥ जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥