भजनी मालिका
← भजनांकडे परत

ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण । आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण

ye hari maj krupa dei dan | nasi timir dakhavi charan | arta puravave bheti deun | nako upekshun aliya sharan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण । आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण ॥१॥ काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणिक दुजे मागणे तुज नाही ॥ध्रु.॥ नाम अखंड हृदयी राही वाणी । नको पडो विसर क्षण जागृती स्वप्नी । संत समागम ऐसा दे लाऊनि । आणीक दुजे काहीं नेणें तुज वाचुनी ॥२॥ पंथ पुरींचा रवी सुत पुरे आतां । आड करावा भवसिंधू ऐसा नव्हता । नाही अडथळा त्रेकोल्या माजी सरता । विनवी तुकया बंधू चरणी ठेउनी माथा ॥३॥