भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काय

yei gan tun mayabapa pandharichya raya | tujavin sin vate kshin jali kay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काय ॥१॥ याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥ध्रु.॥ दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे । पतितपावन नामऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥ विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हणे हेचि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥