भजनी मालिका
← भजनांकडे परत

ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे

ye dashe charitra kelen narayanen | rangatan godhanen rakhitahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥ हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥ आहे तुका म्हणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥