भजनी मालिका
← भजनांकडे परत

यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा

yatihin maj kay to abhiman | mani tuj jan narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जनामधीं होता गांठी ॥२॥ तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥