भजनी मालिका
← भजनांकडे परत

युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें

yuktahar na lage anik sadhanen | alpa narayanen dakhavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटी ॥ध्रु.॥ न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥ तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ॥३॥