भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास

yeun dya ji kanhin vesakaras | antun baher vojecha ghas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥ जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥ तुका म्हणे उद्यां लावीन मनेरा । जे हे दारोदारां भोंवतीं फिरा ॥३॥