भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होईल पुढें

yavari na kale sanchit apulen | kaisen vodavalen hoil pudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यावरी न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होईल पुढें ॥१॥ करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥ जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्त ॥२॥ आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती ॥३॥ तुका म्हणे तेव्हां होतील निश्चळ । इंद्रियें सकळ निरोपानें ॥४॥