भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान

mi ton dinahuni din | majha tuj abhiman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥ मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥ दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥ तुका म्हणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥३॥