भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तव बैसलों धरुनियां आस । न करीं उदास पांडुरंगा

mi tav baisalon dharuniyan as | na karin udas panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी तव बैसलों धरुनियां आस । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥ भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥२॥ तुका म्हणे येऊनियां देई भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥३॥