भजनी मालिका
← भजनांकडे परत

माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोंप नाहीं डोळां

maherincha kay yeil nirop | mhanauni jhomp nahin dolan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥ वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥ बोटावरी माप लेखितों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥२॥ काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप ॥३॥ तुका म्हणे तेथें होईल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥४॥