भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहाविरहित जो

mi das tayacha jaya chad nahin | sukh duhkh dohavirahit jo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥ राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काई तरी पाचारितां पावे । न त्वरित धांवे भक्तीकाजें ॥२॥ सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥ तुका म्हणे त्यास गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥