भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळे हरीदासांची दाटी । रीग न होय शेवटी

mile haridasanchi dati | rig na hoy shevati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मिळे हरीदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥ तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥ कैसें तुज लाजवावें । भक्त म्हणोनियां भावें ॥२॥ नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥ अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥ तुका म्हणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं ॥५॥