न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश
na kale kevhan divas gela | ratrin jhala tamanash
न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश ॥१॥ निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें । नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥
na kale kevhan divas gela | ratrin jhala tamanash
न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश ॥१॥ निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें । नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥
na kalechi adrushtachi gati | na kale karmakarmachi sambhuti | na kale mrutyuchihi riti | kaishi ghadavil kon vel
न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती । न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥१॥ न कळे कर्माकमाची संभूती । न कळे होणार तें बळीवंत । भोगणें भोगवील अकस्मात् । न कळे विधीचेंही लिखित । जें कां रेखियलें निढळी ॥२॥
na kalechi prem yachi godi | dhanve tantadi nam ghetan
न कळेचि प्रेम याची गोडी । धांवे तांतडी नाम घेतां ॥१॥ भरोनियां मन अंतरी राहे परताचि नोहे जवळुनी ॥२॥
na ghalin mi sankaden | tumhan sansarachen koden
न घालीं मी सांकडें । तुम्हां संसाराचें कोडें ॥१॥ नामें गाईन आवडीं । पुढें नाचोनी बागडी ॥२॥
na dekhe jo pandharinath jhala hahabhut janma tyacha
न देखे जो पंढरीनाथ झाला हाहाभूत जन्म त्याचा ॥१॥ वायां गेला पतना नेला । नाहीं आठविला हरि म्हणून ॥२॥
na dhari atan shanka | kashasathi bhiun lokan
न धरी आतां शंका । कशासाठी भिऊं लोकां ॥१॥ ज्याचें ओझें तयावरी । मज हे ऐशी काय थोरी ॥२॥
na dhare dhir dharitan manin | na sante vadanin gunanam
न धरे धीर धरितां मनीं । न संटे वदनीं गुणनाम ॥१॥ आटाहास्यें गर्जना करि । खवळली वैखरी नाटोपे ॥२॥
na pade visar | yacha jaya nirantar
न पडे विसर । याचा जया निरंतर ॥१॥ हाही न विसंबे तयासी । जवळीं राहे अहर्निशीं ॥२॥
na pade visar yacha mana | jhali tadrup vasana | mahi vyapuniyan gagana | dise nayana rup pudhen
न पडे विसर याचा मना । झाली तद्रुप वासना । मही व्यापूनियां गगना । दिसे नयना रुप पुढें ॥१॥ जें जें आढळें दृष्टीपुढें । तें तें याच्या स्वरुपें मांडें । व्यापुनी सकळांमाजिवडें । वसें अंतरीं सकळांचे ॥२॥
na pure dhani gun gatan | rup drushti avalokitan
न पुरे धणी गुण गातां । रुप दृष्टी अवलोकितां ॥१॥ बरवा बरवा विठ्ठल हरी । माझें बैसला अंतरी ॥२॥
na magon kanhi tumhan dhan vitta sampatti | sosuni vipatti nam gaun avadi
न मागों कांही तुम्हां धन वित्त संपत्ती । सोसुनी विपत्ती नाम गाऊं आवडी ॥१॥ न घेऊनियां भार जाणीव शहाणीव माथां । करुं तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥
na rahechi kshanahi bhari | kada nishchal antari
न राहेचि क्षणहि भरी । कदा निश्चळ अंतरी ॥१॥ वाचाळ धोवे तैसें । कार्येविण निरुददेशें ॥२॥
na lage jagen vanaprati | athava ekanti baisanen
न लगे जागें वनाप्रती । अथवा एकांती बैसणें ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा कां वाचे । सकळार्थाचें कारण हें ॥२॥
na vajon yavari atan kothen | sanduni charan he gomate
न वजों यावरी आतां कोठें । सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥ जोडलें ते भाग्ययोगें । येणे काळें संतसंगें ॥२॥
na vaten hen sangatan kharen | na yetan baren svanubhava
न वाटें हें सांगतां खरें । न येतां बरें स्वानुभवा ॥१॥ बुध्दि मलीन झाली कामें । संसारभ्रमें मन वेडें ॥२॥
na visambe tya ghatikan pal | tyachipashin sarvakal
न विसंबे त्या घटिकां पळ । त्याचिपाशीं सर्वकाळ ॥१॥ उत्तीर्णत्वालागीं हरि । त्याची परिचर्या करी ॥२॥
na visambechi mauli bala | adabhut snehacha kalavala
न विसंबेचि माउली बाळा । अदभुत स्नेहाचा कळवळा ॥१॥ तुम्ही तो जाणतसा नीत । तरि कां ऐसें विपरित ॥२॥
na sandal tumhi apalya vihita | pari mi kariton chinta murkhapanen
न सांडाल तुम्ही आपल्या विहिता । परी मी करितों चिंता मूर्खपणें ॥१॥ रवि केवीं सांडीं आपला प्रकाश । अमृता मिठांश जीवविता ॥२॥
na sampade aisi kadhin | vel lagali te sandhi
न सांपडे ऐसी कधीं । वेळ लागली ते संधी ॥१॥ हरिचे गुण वाचे यावे । श्रवणीं श्रवण ते करावे ॥२॥
naka pahu majhe kriyaacharit | bhakta bhagavat navhe dnyani
नका पाहू माझे क्रियाआचरित । भक्त भागवत नव्हे ज्ञानी ॥१॥ आठवितां नाम नेणें दुजी परी । मी माझे श्रीहरि नाहीं गेलें ॥२॥