भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

देवावीण भक्तांचें संकट । कोणतें अरिष्ट निवारित ॥१॥ कोणासी शरण जातें तेव्हां । कळिकाळ जेव्हां आकळूं येतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देवें भक्तालागीं उपचार मांडिले । शांति सुखसनी मागें बैसविलें । धरुनि तन्मयाचीं छत्रें गौरविलें । ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले ॥१॥ सुखें राज्य करा म्हणे त्रिमुवनीं । माझें ऐश्वर्य हें सर्वांगी लेंउनी । मिरवा भूषणें हीं यश कीर्ति दोन्हीं । माझीं आयुधें हीं देतों संतोषोनी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देशें काळें वर्तमानें । न धरीं संकोच कांही मनें । मी तो ऐसाचि हें शहाणे । जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥१॥ तंव तो आला अकस्मात । नारदमुनी गात नाचत । वंदूनियां श्रीकृष्णनाथ । कीर्ति विर्णित कृष्णाची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दोरीचाचि सर्प परि होय मारक । संदेहकारक नोळखतां ॥१॥ तैसी परी केली तुम्हां माझया कर्मे । सांडविलें नेमें स्वधर्मासि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दोहीं डोळां घालुनी वाती । पाहे वाट दिवसरातीं ॥१॥ केव्हां येशील बा धांवोनी । प्रेमपान्हा पाजिसी स्तनीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥ कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उध्दरी जगाचे कलिदोष ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धन्य त्याचा शुध्‍द भावो । आरधिला देवो पंढरीचा ॥१॥ धन्य त्यांचें जन्मकर्म । गाईलें नाम विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धन्य त्यांची तयां माय प्रसवली । ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रुपीं ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल भोजनीं । विठ्ठल शयनीं न विसंबती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी । गोदेचियें तिरीं पुण्यभूमि ॥१॥ धन्य तो श्रीगुरु जनार्दन सखा । त्रैलोक्य देखा पावन केलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा