भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य झालों कृपा केली । भेटी दिधलीं अवचिती

dhanya jhalon krupa keli | bheti didhalin avachiti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य झालों कृपा केली । भेटी दिधलीं अवचिती ॥१॥ सांभाळिलें तुम्ही संती । केल्या आर्ती परिपूर्ण ॥२॥ मी तो दीन तुमचा रंक । घातली भीक अभयाचि ॥३॥ निळा म्हणे न भेणें आतां । सन्मुख येतां किळिकाळ ॥४॥