भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य एकनाथा । तुमचें पायीं माझा माथा

dhanya dhanya ekanatha | tumachen payin majha matha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य धन्य एकनाथा । तुमचें पायीं माझा माथा ॥१॥ दासोपंताचा अभिमान । गेला होताचि दरुशन ॥२॥ दत्तात्रय चोपदार । पुढें उभे कांठीकर ॥३॥ यवन अंगावरीं थुंकला । प्रसाद देऊनि मुक्त केला ॥४॥ निळा शरण तुमच्या पायां । अनन्य भावें नाथराया ॥५॥