भजनी मालिका
← भजनांकडे परत

न पडे विसर याचा मना । झाली तद्रुप वासना । मही व्यापूनियां गगना । दिसे नयना रुप पुढें

na pade visar yacha mana | jhali tadrup vasana | mahi vyapuniyan gagana | dise nayana rup pudhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न पडे विसर याचा मना । झाली तद्रुप वासना । मही व्यापूनियां गगना । दिसे नयना रुप पुढें ॥१॥ जें जें आढळें दृष्टीपुढें । तें तें याच्या स्वरुपें मांडें । व्यापुनी सकळांमाजिवडें । वसें अंतरीं सकळांचे ॥२॥ स्वरुप सांवळें सगुण । अंगकांति मेघवर्ण । करीं धरुनियां जघन । दृष्टी अवलोकीं पुंडलिका ॥३॥ कर्णी कुंडलें विशाळ डोळें । जैसीं विकासलीं दिव्य कमळें । हदयावरीं कंठमाळे । पदकीं रत्नें झळकती ॥४॥ कास पितांबरें घातलीं । मेखळा कटीं सूत्रें रेखिलीं । पाउलें विटेवरीं शोभलीं । निळयां झालीं प्रसन्न तीं ॥५॥