भजनी मालिका
← भजनांकडे परत

न सांडाल तुम्ही आपल्या विहिता । परी मी करितों चिंता मूर्खपणें

na sandal tumhi apalya vihita | pari mi kariton chinta murkhapanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न सांडाल तुम्ही आपल्या विहिता । परी मी करितों चिंता मूर्खपणें ॥१॥ रवि केवीं सांडीं आपला प्रकाश । अमृता मिठांश जीवविता ॥२॥ परी मी अधीर न धरितां धीर । करीं करकर रुसोनियां ॥३॥ निळा म्हणे झाले अपराध ते क्षमा । करा पुरुषोत्तमा विनवूं काय ॥४॥