भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश

na kale kevhan divas gela | ratrin jhala tamanash

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश ॥१॥ निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें । नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥ भोक्ताचि नाहीं कैचा भोग । अनंगीं अभंग हारविलें ॥३॥ निळा म्हणे ठांई ठावो । देवीं देवो मावळला ॥४॥