भजनी मालिका
← भजनांकडे परत

न वजों यावरी आतां कोठें । सांडुनि चरण हे गोमटे

na vajon yavari atan kothen | sanduni charan he gomate

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न वजों यावरी आतां कोठें । सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥ जोडलें ते भाग्ययोगें । येणे काळें संतसंगें ॥२॥ दुभिन्नले वरुषोनी वरी । प्रेमअमृताच्या धारीं ॥३॥ निळा म्हणोनी सांठी । केली जिवें देउनी मिठी ॥४॥