भजनी मालिका
← भजनांकडे परत

न लगे जागें वनाप्रती । अथवा एकांती बैसणें

na lage jagen vanaprati | athava ekanti baisanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न लगे जागें वनाप्रती । अथवा एकांती बैसणें ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा कां वाचे । सकळार्थाचें कारण हें ॥२॥ न लगे आसन मुद्रा । सांडणें कळा योगस्थिति ॥३॥ निळा म्हणे उधळण सार । न लगे निराहार व्रतचर्चा ॥४॥