भजनी मालिका
← भजनांकडे परत

न मागों कांही तुम्हां धन वित्त संपत्ती । सोसुनी विपत्ती नाम गाऊं आवडी

na magon kanhi tumhan dhan vitta sampatti | sosuni vipatti nam gaun avadi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न मागों कांही तुम्हां धन वित्त संपत्ती । सोसुनी विपत्ती नाम गाऊं आवडी ॥१॥ न घेऊनियां भार जाणीव शहाणीव माथां । करुं तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥ वसउनि संतसमुदाय भोंवते । गाऊं नाचूं प्रेमें आठवुनि तुम्हातें ॥३॥ निळा म्हणे ऐशापरी सारुं आयुष्य । करुनियां दास्य राहों तुमचे चिंतनी ॥४॥