भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

नाकीं तोंडी वाहे रुधिर । हातापायांचा झाला चूर । मस्तक मेंदु उसळे बाहेर । मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥१॥ तया देऊनि उतम गती । आनंदें बळरामश्रीकृष्ण्‍ नाचती । तांडव विसरे उमापति ॥ कौशल्य तयांचे देखोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाठवीता स्वयें दयावी आठवण । ते तों आहे खूण सद्गुरुची ॥१॥ ऐशिया प्रकारें बोधवितां शिष्या । अंतरीं प्रकाशा काय उणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाना अवतार धरिले जेणें । दैत्यांसी उणें आणियेलें ॥१॥ तो हा संताचिये भारी । उभा तीरीं चंद्रभागे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाना मतांतरें शब्दाच्या व्युत्पत्ती । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥ माझया विठोबाचे वर्म आहे दुरी । कैची तेथें उरी देहभावा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाना साधनें मंत्र तंत्र । उपासना यंत्र अवघड तें ॥१॥ म्हणोनियां हरिचें । भाविकां सुगम हरिभक्तां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाम तारक हें श्रीहरी । गर्जतां तुमचे भव सागरी ॥१॥ ऐसें जाणोन वैष्णवजन । करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाम सांडुनिया मुक्ति घेणें । हे तों लक्षणें अधमाची ॥१॥ आम्हा विष्णुदासा धर्म । नित्य नेम कथेचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नामचि एक विठोबाचें । अवघ्या साधनाचें शिरोरत्न ॥१॥ उच्चार मात्र करितां ओठी । प्रगटे पोटीं हरिरुप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नामचिंतनें जडली प्रीती । भगवदभावना सर्वभूतीं ॥१॥ हेचि परमार्थ साधन । मुखीं नाम ह्रदयीं ध्यान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा