भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाठवीता स्वयें दयावी आठवण । ते तों आहे खूण सद्गुरुची

nathavita svayen dayavi athavan | te ton ahe khun sadguruchi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाठवीता स्वयें दयावी आठवण । ते तों आहे खूण सद्गुरुची ॥१॥ ऐशिया प्रकारें बोधवितां शिष्या । अंतरीं प्रकाशा काय उणें ॥२॥ आपुलें स्वराज्य फावें आपणांसीं । नित्य सदभ्यासीं तद्रूपता ॥३॥ निळा म्हणे ऐशी सद्गुरुपें कळा । परी आहे विरळा बोधक तो ॥४॥