भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाकीं तोंडी वाहे रुधिर । हातापायांचा झाला चूर । मस्तक मेंदु उसळे बाहेर । मुष्टिक चाणुर निर्दाळिले

nakin tondi vahe rudhir | hatapayancha jhala chur | mastak mendu usale baher | mushtik chanur nirdalile

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाकीं तोंडी वाहे रुधिर । हातापायांचा झाला चूर । मस्तक मेंदु उसळे बाहेर । मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥१॥ तया देऊनि उतम गती । आनंदें बळरामश्रीकृष्ण्‍ नाचती । तांडव विसरे उमापति ॥ कौशल्य तयांचे देखोनी ॥२॥ मोहित होऊनियां नारी नर । अवलोकिती बळिराम आणि श्रीधर । परम सुंदरा सुंदर । नागरा नागर भुलवणें ॥३॥ अवलोकिती कृष्णाकृती । लवोंचिं विसरलीं नेत्रपातीं । बळिराम देवाचीही मूर्ती । राजस सुकुमार त्याचिपरी ॥४॥ अंगी यशाचें गौरव । रुप लावण्याची ठेव । पहातां नयनां न पुरे हांव । मना स्वयमेव तेंचि होणें ॥५॥ यापरी तटस्थ् सकळां । लागले नरनारी बाळा । तेणें बहमानंद सुकाळा । झाली अधिकारी भोगिती ॥६॥ निळा म्हणे यावरी रावो । पावेल मुक्तीचा गौरवो । सोलीव सुखाचा स्वानुभवो । समर्पील कृष्णा तयासी ॥७॥