नाहीं उरविलें दुजें । तुमच्या तेजें झांकोळिलें
nahin uravilen dujen | tumachya tejen jhankolilen
नाहीं उरविलें दुजें । तुमच्या तेजें झांकोळिलें ॥१॥ माझीचि मज न दिसतीं । निजांगें दीप्ति प्रकाशें ॥२॥
nahin uravilen dujen | tumachya tejen jhankolilen
नाहीं उरविलें दुजें । तुमच्या तेजें झांकोळिलें ॥१॥ माझीचि मज न दिसतीं । निजांगें दीप्ति प्रकाशें ॥२॥
nahin aisen unenchi kothen | bharato pot tondavari
नाहीं ऐसें उणेंचि कोठें । भरतो पोट तोंडवरी ॥१॥ बाहेर येती वोसंडोन । चाही कोन उथळोनी ॥२॥
nahin kothen gonvila het | thevilen chitta yachivari
नाहीं कोठें गोंविला हेत । ठेविलें चित्त याचिवरी ॥१॥ सगुण सुंदर देखिलें दिठीं । विटे नेहटी तेंचि पुरे ॥२॥
nahin kona upekshilen | bahutan kelen sanath
नाहीं कोणा उपेक्षिलें । बहुतां केलें सनाथ ॥१॥ माझेचि विशीं आळस केला । कां जी विठठला मी नेणें ॥२॥
nahin kona upekshilen | sakalan sanmanen sthapilen | apuliye padin baisavilen | dene didhalen apar
नाहीं कोणा उपेक्षिलें । सकळां सन्मानें स्थापिलें । आपुलिये पदीं बैसविलें । देणे दिधलें अपार ॥१॥ चुळा एका दुधासाठीं । स्तवितांचि उपमन्यें जगजेठी । करुनियां क्षिराब्धीची वाटी । लाविली ओठी तयाचिये ॥२॥
nahin ghadali kamai taisi | magen jaisi santanchi
नाहीं घडली कमाई तैसी । मागें जैसी संतांची ॥१॥ म्हणोनियां उपेक्षिलें । ऐसिये लोटिलें भवार्णवीं ॥२॥
nahin tari sant jhakavit kona | thor lahana sarakhechi
नाहीं तरि संत झकवित कोणा । थोर लहाना सारखेचि ॥१॥ नाहीं तेथें कानें कोचें । उघडया वाचें उच्चार ॥२॥
nahin tumhampashin kavanevishin unen | nandatasan gunen sampattichya
नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं उणें । नांदतसां गुणें संपत्तीच्या ॥१॥ न करावा अव्हेर तुम्ही अनाथाचा । बडिवार तुमचा हाचि असे ॥२॥
nahin tenchi anuni thevi | chad jivin jen vate
नाहीं तेंचि आणूनि ठेवी । चाड जिवीं जें वाटे ॥१॥ समयाचे समया वरीं । निर्माण करी आणि पुरवी ॥२॥
nahin tya uralen dujen krushnavin
नाहीं त्या उरलें दुजें कृष्णविण । ब्राह्य अंत:करण कृष्ण झाला ॥१॥
nahi bhajan pujan kelen | purvi hen alen svanubhava
नाही भजन पूजन केलें । पूर्वी हें आलें स्वानुभवा ॥१॥ तुम्ही अव्हेरिलें देवा । करितां धांवा नाईका ॥२॥
nahin bhinnatva uralen | avaghya angen avaghen jhalen
नाहीं भिन्नत्व उरलें । अवघ्या अंगें अवघें झालें ॥१॥ नेणती ते मानामान । जन तैसें तयां वन ॥२॥
nahin majha uravila | sandeh avaghachi phedila
नाहीं माझा उरविला । संदेह अवघाचि फेडिला ॥१॥ म्हणोनियां त्याच्या सुखें । नाचें कीर्तनीं मी हरिखें ॥२॥
nahin mhanatan avaghen tenchi | ahe mhanatanchi davitan naye
नाहीं म्हणतां अवघें तेंचि । आहे म्हणतांचि दावितां नये ॥१॥ म्हणोनियां न चले शब्द । राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥
nahin laukikashin kaj | majhen guj to janen
नाहीं लौकिकाशीं काज । माझें गुज तो जाणें ॥१॥ अंतर्बाह्य ठावें तयां । येईल बाह्य पसरुनी ॥२॥
nahin laukikasi kam | gain nam sarvada
नाहीं लौकिकासी काम । गाईन नाम सर्वदा ॥१॥ हेंचि माझें भांडवल । विठ्ठल विठ्ठल खरें नाणे ॥२॥
nahin vari palamatra ghadi | gele kalpakodi yanchipari
नाहीं वारी पळमात्र घडी । गेले कल्पकोडी यांचिपरि ॥१॥ आतां कधीं मोकळा होसी । मग या पावसी परमार्था ॥२॥
nahi vithobachen prem | ganiv shram vruthachi to
नाही विठोबाचें प्रेम । गाणीव श्रम वृथाचि तो ॥१॥ काय करिती आपुल्या दैवा । भुली वैभवा जाणिवेच्या ॥२॥
nahin vishvas jaya gathin | na pahati dithin pandhari te
नाहीं विश्वास जया गाठीं । न पाहती दिठीं पंढरी ते ॥१॥ अदृष्ट त्यांचे हीन झालें । न देखती पाउलें विटेवरी ॥२॥
nahi shabdadhin varma ahe duri | navhe tantramantrin anubhav to
नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्रीं अनुभव तो ॥१॥ हर्षामर्ष आंगीं आंदोलती लाटा । कामक्रोधे तटा सांडीयले ॥२॥