भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्रीं अनुभव तो

nahi shabdadhin varma ahe duri | navhe tantramantrin anubhav to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्रीं अनुभव तो ॥१॥ हर्षामर्ष आंगीं आंदोलती लाटा । कामक्रोधे तटा सांडीयले ॥२॥ न सरें ते भक्ती विठोबाचे पाई । उपरती नाहीं जेथें चित्तां ॥३॥ निळा म्हणे सुख देहनिरसनें । येर ते वचनें व्यर्थ वाया ॥४॥