भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं तेंचि आणूनि ठेवी । चाड जिवीं जें वाटे

nahin tenchi anuni thevi | chad jivin jen vate

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं तेंचि आणूनि ठेवी । चाड जिवीं जें वाटे ॥१॥ समयाचे समया वरीं । निर्माण करी आणि पुरवी ॥२॥ नेदी दिसों केविलवाणें । मिरवी भूषणें निजांगीचीं ॥३॥ निळा म्हणे गुंतला भाके । धांवे हाके पाचारितां ॥४॥