भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं तरि संत झकवित कोणा । थोर लहाना सारखेचि

nahin tari sant jhakavit kona | thor lahana sarakhechi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं तरि संत झकवित कोणा । थोर लहाना सारखेचि ॥१॥ नाहीं तेथें कानें कोचें । उघडया वाचें उच्चार ॥२॥ न लागे पूजनासी धन वित्त । एकचि चित्त भाव पुरे ॥३॥ निळा उपदेश देती । कानीं सांगती विठ्ठल म्हणा ॥४॥