भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं उणें । नांदतसां गुणें संपत्तीच्या

nahin tumhampashin kavanevishin unen | nandatasan gunen sampattichya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं उणें । नांदतसां गुणें संपत्तीच्या ॥१॥ न करावा अव्हेर तुम्ही अनाथाचा । बडिवार तुमचा हाचि असे ॥२॥ देऊं म्हणाल तरी ब्रम्हांड तुमचें । अंगी ऐश्वर्याचें सामर्थ्यही ॥३॥ निळा म्हणे भेटी न लावाल उशीर । क्षणेंची अवतार धरोनी ठाका ॥४॥