भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

निंदील कोणी मज तो निंदूं । अथवा स्तुतिवादु करोत सुखें ॥१॥ परि मी गाईन पंढरीनाथा । गुण तत्त्वतां तुमचेचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निपुण म्हणती हा आमुचा गुरु । ज्ञानी म्हणति हा परात्परु । योगी म्हणती योग साचारु । याचिपासुनी जन्मला ॥१॥ याज्ञिक म्हणती भासे कृष्ण । यज्ञरुपीं हा नारायण । वैदिकांही लागले ध्यान । म्हणती वेद मूर्तिमत हाचि दिसे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निरंतर तुमच्या नामाचें स्मरण । आठवीन गुण वेळोवेळां ॥१॥ रुप दृष्टीं पाय ध्याईन मानसीं । हाचि अहर्निशी निजध्यास ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निर्गुण निरामय संचले । गुणीतीत रुपा आलें । परात्पर तें सगुण झालें । उभें ठाकलें विटेवरी ॥१॥ कोटी कंदर्पाच्या दीप्ति । विराजली अंगकांति । गुणलावण्याची संपत्ती । विठ्ठल मूर्ति गोजिरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणीवचि न रिघे तेथें काय जाणावें ॥१॥ म्हणऊनियां येथें अवघा खुंटला वाद । विरोनियां गेला अवघा अभेदीं भेद ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निर्विकार असोनि आत्मा । अवघ्या भूतग्रामा प्रकाशी ॥१॥ एरवीं करी ना करवी । जेवीं रवि निज व्योमीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं । सोपानदेवा नामसंकीर्तनी । मुक्ताबाई निजमुक्तिस्थानीं । निजानंदीं गौरविलें ॥१॥ ज्ञानदेवा दिधली समाधी । नामदेवा स्थापिलें निजपदीं ॥ परसा भागवताची वाडनदी । सुस्नात केली कीर्तनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निवेदिलें पायांपाशीं । जें जें मानसीं होतें तें ॥१॥ आतां उचित तैसें करा । आम्ही तों ससारा आचवलों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नीत नवा प्रेमा कृपेचिया बळें । अंतरीं हा वोळे आनंदघन ॥१॥ नाचतीं मयूरें रोमांचीत दाटी । अमृताची वृष्टी जीवनकळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नुठेचि मन वरुनियां । जडोनी ठेलें हरीच्या पायां ॥१॥ बुध्दि निश्येंसी राहिली । परम विश्रांति पावली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नुरवूनि दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनीं ॥१॥ आळवूनि वाचें याचीं उत्तम नामें । सारिन काळ याचिपरि सुखसंभ्रमें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा