भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणीवचि न रिघे तेथें काय जाणावें

nirmanachi nahin tyachen kay varnaven | janivachi na righe tethen kay janaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणीवचि न रिघे तेथें काय जाणावें ॥१॥ म्हणऊनियां येथें अवघा खुंटला वाद । विरोनियां गेला अवघा अभेदीं भेद ॥२॥ जागृति ना निद्रा जेथें नाहीं सुषुप्ती । तुर्या ना उन्मनी कैंची स्वप्नाची भ्रांती ॥३॥ निळा म्हणे अनुभव तेथें अनुभवितें कैंचे । निमोनियां गेलें ऐक्य उरलें मुळींचे ॥४॥