भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंतर तुमच्या नामाचें स्मरण । आठवीन गुण वेळोवेळां

nirantar tumachya namachen smaran | athavin gun velovelan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निरंतर तुमच्या नामाचें स्मरण । आठवीन गुण वेळोवेळां ॥१॥ रुप दृष्टीं पाय ध्याईन मानसीं । हाचि अहर्निशी निजध्यास ॥२॥ आवडी बैसली अवीट अंतरीं । नव्हे क्षणभरी विसरु ते ॥३॥ निळा म्हणे चित्ता चिंतनाचा लाहो । रुक्मादेवीनाही साह्य झाला ॥४॥