भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीत नवा प्रेमा कृपेचिया बळें । अंतरीं हा वोळे आनंदघन

nit nava prema krupechiya balen | antarin ha vole anandaghan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नीत नवा प्रेमा कृपेचिया बळें । अंतरीं हा वोळे आनंदघन ॥१॥ नाचतीं मयूरें रोमांचीत दाटी । अमृताची वृष्टी जीवनकळा ॥२॥ आकाशें दुमदुमी गर्जे अनुहत । सुनीळ तळपत विदयुल्लता ॥३॥ पिकली भूमिका बीज आलें फळा । अव्दय निजकळा सवंगिलें ॥४॥ भाग्यवंत निळा सांठवी निराळीं । आत्मया जवळी निकटवासें ॥५॥