भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरवूनियां विठ्ठल देवा । हातीं धरावा मज आतां

niravuniyan viththal deva | hatin dharava maj atan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निरवूनियां विठ्ठल देवा । हातीं धरावा मज आतां ॥१॥ तुमचिया भिडा अंगिकार । करील साचार तत्क्ष्णी ॥२॥ जरी मी अन्यायी अपराधी । तरी कृपानिधी तुम्ही संत ॥३॥ निळा म्हणे विनऊं काय । तुम्ही मायबाप अपत्य मी ॥४॥