भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम वाचे श्रवण कीर्ति । पाउलें चित्तीं समान

nam vache shravan kirti | paulen chittin saman

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाम वाचे श्रवण कीर्ति । पाउलें चित्तीं समान ॥१॥ काळ सार्थक केला त्यांनी । धरिला मनीं विठ्ठल ॥२॥ कीर्तनाचा समारंभ । निर्दभ सर्वदा ॥३॥ निळा म्हणे स्वरुपसिध्दि । नित्य समाधि हरिनामीं ॥४॥